पुणे : मोटारीची काच फोडून लॅपटॅाप, कागदपत्रे लांबविण्यात आल्याची घटना स्वारगेट भागातील प्राप्तीकर भवन कार्यालयासमोर घडली. याबाबत व्यावसायिक अच्युत कोठारी (वय ४२, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोठारी व्यावसायिक आहेत. कामानिमित्त ते स्वारगेट परिसरात आले होते. प्राप्तीकर कार्यालयासमोर कोठारी यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीतून लॅपटॅाप तसेच बँकेची धनादेश पुस्तिका, महत्त्वाची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.

पोलीस हवालदार ए. जी. पाटील तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालक तरुणीचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी सोन्याचे कडे, कागदपत्रे असा दोन लाख ५५ हजारांचा ऐवज लांबविण्याची घटना घडली होती.

Story img Loader