पुणे: मार्केट यार्डात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या एकाच्या मोटारीच्या काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटाॅप, हार्ड डिस्क तसेच अन्य साहित्य चोरल्याची घटना घडली. याबाबत विभीषण गोरुले (वय ३३, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोरुले यांची कंपनी आहे. दिवाळीनिमित्त कंपनीतील कामगारांना सुकामेव्याचे बाॅक्स खरेदीसाठी गोरुले मार्केट यार्ड परिसरात आले होते. मार्केट यार्ड परिसरातील टपाल कार्यालयासमोर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीतील दोन लॅपटाॅप, हार्ड डिस्क, आयपाॅड असा एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा