पुणे : बिबट्याची शिकार करून अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला आहे.

याप्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (दोघे रा. डेक्कन जिमखाना) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातून जाधव बंधूंविरुद्ध यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. तेव्हा एका महिलेने जाधव यांच्याकडे बिबट्याचे कातडे असल्याचे नमूद केले होते. याबाबत वन विभागाकडेही तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पसार झाले असून, पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत

हेही वाचा – पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

खडकवासला धरण परिसरातील मांडवी खुर्द गावातील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करून अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने रविवारी फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथील एका कपाटात बिबट्याचा नखांसह पंजा सापडला.

हेही वाचा – तलाठी भरतीतील गोंधळावरून रोहित पवार यांची सरकारवर टीका, म्हणाले, “सरकारला गांभीर्य आहे की नाही?”

दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने तोडफोड करून कामगारांना मारहाण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी विश्वजित जाधव याच्यासह चौघांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याने बंदुकीचा धाक दाखवून मालकी हक्काची कागदपत्रे तयार केल्याची तक्रार पत्नी निकिता यांनी दिली आहे. निकिता या हॉटेलचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या कन्या आहेत.

Story img Loader