पुणे: महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत साकुड (ता. आंबेजोगाई) येथे देवणी व लालकंधारी गोवंशाचे पशुपैदास प्रक्षेत्र उभारले जाणार आहे. पण, प्रक्षेत्र होणारी जागा माळरान आहे. या परिसरात गोवंशाची फारशी पैदास होत नाही. प्रक्षेत्रासाठी ही जागा प्रतिकूल आहे, असा सूर गोवंश अभ्यासकांमधून उमटत आहे.

मराठवाड्यात प्रामुख्याने नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत लालकंधारी आणि देवणी गोवंशाची पैदास होते. सन २०१३च्या पशुगणनेत देवणी गोवंशाची संख्या १,२६,६०९ होती, तर लालकंधारीची संख्या ४,५६,७६८ होती. सन २०१९च्या पशुगणनेत संख्येत वेगाने घट होत असल्याचे समोर आले. देवणीची संख्या १,२३,९४५, तर लालकंधारीची संख्या १,४९,१५९वर आली आहे. गोवंशाच्या घटीचा वेग पाहता लालकंधारी गोवंश भविष्यात नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे या दोन्ही गोवंशाचे स्थानिक पातळीवरच जतन आणि संवर्धन होण्यासाठी साकुड येथे पशुपैदास प्रक्षेत्र उभारले जाणार आहे.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचा… पिंपरी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञान सक्षम होणार; सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग

पण, साकुड येथील जागा माळरान आहे. शिवाय साकुड परिसरात गोवंशाची फारशी पैदास होत नाही. त्यामुळे साकुड येथील प्रक्षेत्र पशूंच्या पैदासीसाठी पोषक नाही. राज्य सरकारने देवणी आणि लालकंधारी जातीच्या गोवंशाची पैदास होणाऱ्या भागातच प्रक्षेत्र उभारावे, अशी मागणी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी केली आहे.

हेही वाचा… पुण्यातील ३४ समाविष्ट गावांतील सांडपाणी वाहिन्यांचे काम निकृष्ट? आता होणार पोलखोल

राज्यात पशुसंवर्धन विभागाची आणि कृषी विद्यापीठांची अनेक ठिकाणी पशुपैदास प्रक्षेत्रे आहेत. या प्रक्षेत्रांना अनेक वर्षांपासून सरकाराचे पुरेसे अनुदान मिळाले नाही, ही प्रक्षेत्रे सोई-सुविधा देऊन सक्षम करण्याची गरज असताना, प्रतिकूल ठिकाणी, माळरानावर, पैदास होत नसलेल्या साकुड येथे देवणी व लालकंधारी गोवंशाचे प्रक्षेत्र उभारण्याचा घाट घातला जात आहे, असे मत परभणी येथील पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा… पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर पार्थ पवार यावेत ही सर्वाची इच्छा: अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका देवणी गोवंशाचे मूळ पैदास ठिकाण आहे. देवणी गोवंशाचे पैदास प्रक्षेत्र आमच्याच तालुक्यात झाले पाहिजे. आंबेजोगाईचा देवणी आणि लालकंधारी गोवंशाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण साकुड येथे प्रक्षेत्राची उभारणी करू नये. आम्ही सरकारच्या निर्णयाला विरोध करू, असा इशारा देवणी येथील गोपालक, सामाजिक कार्यकर्त्या कुशावर्ता बेळे यांनी दिला आहे.