पिंपरी : मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली. अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त…. शाळा तपासणी कशी ठरणार ‘असर’दार?

फिर्यादी तरूणी तिच्या मावस बहिणीच्या घरी असताना आरोपी घरात घुसला. फिर्यादी मोबाईलवर बोलत असताना आरोपीने कोणाशी बोलत आहेस, म्हणून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग येवून आरोपीने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, तरूणीची मावस बहीण सोडविण्यास आली असता तिच्या गालावर कोयत्याने वार करत जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याचा तपास फौजदार माने करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man in pimpri broke into a house and stabbed his female friend with koyta for not giving him her mobile pune print news ggy 03 psg