दारु पिताना झालेल्या वादातून चुलतभावावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना वडाची वाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकास अटक केली.
हेही वाचा- मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गजाआड; पाच दुचाकी जप्त
सुभाष चौधरी (वय ५५, रा. वडाची वाडी, नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी संपत तुकाराम चौधरी (वय ४६) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सुभाष यांचा मुलगा सौरभ (वय २३) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संपत आणि सुभाष चुलतभाऊ आहेत. दोघेजण वडाची वाडी परिसरात सायंकाळी दारु प्यायला बसले होते. दारू पिताना झालेल्या वादातून आरोपी संपतने सुभाष यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. पसार झालेल्या संपतला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.