मित्राच्या पत्नीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली. आरोपीने महिलेच्या मुलाचे अपहरण करुन तिच्यावर चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली होती. साजिद मोहंमद अली कुंजू (वय ३९, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कुंजूची साथीदार हसिना हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणारे तिघे गजाआड
आराेपी कुंजू पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपीने पीडित महिलेच्या मोबाइलवर अश्लील संदेश पाठविले. माझ्याशी मैत्री केली नाही तर तुला मारुन टाकेल. तसेच तुझी छायाचित्रे समाजमाध्यमातून प्रसारित करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली होती. त्यानंतर महिलेच्या मुलाचे अपहरण करुन त्याने चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. पीडित महिलेला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला तसेच तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली.
हेही वाचा- पुणे ग्रामीण भागातील सीएनजी पंप बेमुदत बंद; वाहनधारकांना मनस्ताप
आरोपी कुंजू याची बहीण हसिनाने भावाशी संबंध ठेवण्यासाठी पीडित महिलेला धमकावले होते. आरोपींच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नागवडे तपास करत आहेत.