पिंपरी : तुला कापड दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाही तर तुला दुकानासह जाळून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी देवून ५०० रुपये खंडणी उकळणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधव वाघमारे (रा.लिंकरोड पत्राशेड, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचा पिंपरी मार्केटमध्ये रेडीमेड कापड विक्रीचा व्यवसाय आहे.

हेही वाचा – पुणे : रॅप गाणे प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाकडून उच्च स्तरीय समिती

आरोपी माधव, आतिश शिरसाट व त्यांचा साथीदार हे ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता आणि १४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तक्रारदार यांच्या दुकानात गेले. तक्रारदाराला शिवीगाळ केली. आरोपी माधव वाघमारे याने तक्रारदार यांना ‘तुला कापड दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, हप्ता दिला नाहीतर तुला दुकानासह जाळून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी देवून ५०० रुपये खंडणी घेतली.

हेही वाचा – पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीत आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे जेरबंद

आरोपी माधव याचा साथीदार आतिश शिरसाट याने तक्रारदार यांच्या दुकानातील एक हजार ३५० रुपये किंमतीचे तीन शर्ट जबरदस्तीने घेतले. तक्रारदार यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत आरोपी माधव याला अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man was arrested for threatening to burn down a cloth shopkeeper along with his shop demanding ransom pune print news ggy 03 ssb