लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Walmik Karad Arrest
Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक
stock market, fraud with citizen of Dombivli ,
शेअर मार्केटमधील २५ वर्ष अनुभव असलेल्या डोंबिवलीकराची ३१ लाखाची फसवणूक
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा
mumbai, retired woman income tax department Digital arrested
प्राप्तीकर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्ट, २५ लाख रुपयांची सायबर फसवणूक

याप्रकरणी रवि नरोत्तम ओझा (रा. प्रितम सोसायटी, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉन पॉलराज व्हिन्सेट ( रा. वानवडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. ओझा याने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून जॉन यांना जाळ्यात ओढले. त्यांनी ओझा याच्यावर विश्वास ठेवून सेवानिवृत्तीनंतर मिळालेले ४० लाख रुपये गुंतवले.

हेही वाचा… तंत्रज्ञानाची कमाल! पुणेरी मेट्रोने ब्रेक दाबताच मिळणार वीज

ओझा याने रक्कम घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने जाॅन यांनी रक्कम परत करण्यास सांगितले. तेव्हा ओझाने टाळाटाळ सुरु केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाॅन यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ओझाने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

Story img Loader