पुणे : वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. दोघेजण एकत्र राहत होते.

पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम चिडला होता. तो नईमच्या पाळतीवर होता. बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम थांबला होता. काही वेळानंतर नईम तेथे आला. त्याने खिशातून वस्तरा काढला. नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…पुणे पोलिसांनी कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर फिरवले बुलढोझर!

गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले.