आठ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळे गुरव येथे हा प्रकार घडला. संदीप शशीकांत भिंगारदिवे (वय ३७, रा. विटा, खानापूर, सांगली) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
हेही वाचा- पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी: तोतया पत्रकार अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॉकलेट देतो म्हणून आरोपीने या मुलीलासोबत नेले. एका बंद खोलीत तिला नेले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक चाळे केले. याबाबतची माहिती मुलीच्या आईला समजली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.