पुणे : मार्केट यार्ड परिसरातील शिवनेरी रस्त्यावर असलेल्या वाहनतळाच्या जागेवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी बाजार समितीच्या कार्यालयावर सोमवारी मूक मोर्चा काढला. मोर्चात स्थानिक रहिवाशांसह मार्केट यार्ड भागातील व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्केट यार्ड भागातील उत्सव हाॅटेलपासून मोर्चाचा प्रारंभ झाला. मोर्चात स्थानिक रहिवाशांसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाजार समितीच्या निर्णयाच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. मोर्चाची सांगता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालय येेथे करण्यात आली. बाजार समितीचे सचिव डाॅ. राजाराम धोंडकर यांना निवेदन देण्यात आले.मार्केट यार्ड भागात मोठ्या संख्येने जैन बांधव राहायला आहेत. बाजार समितीच्या मोकळ्या जागेत वाहनतळ आहे. वाहनतळाच्या जागेवर मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासळी बाजार सुरू झाल्यास या भागात अस्वच्छता निर्माण होईल, तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असे मोर्चात सहभागी झालेल्या रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>>“बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे”, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

आमदार माधुरी मिसाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, बाळासाहेब ओसवाल, वालचंद संचेती, विजयकांत कोठारी, अचल जैन, विजय भंडारी, फत्तेचंद रांका, ललित जैन, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, राजेश शहा, राजेंद्र गुगळे, रायकुमार नहार, नितीन जैन, विलास भुजबळ, कुणाल ओस्तवाल, नितीन कदम आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

काँग्रेस आक्रमक

बाजार समितीने मोकळ्या जागेत मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ दिवसांत निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला. अभय छाजेड, प्रवीण चोरबेले यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

बाजार समितीच्या संचालक मंडळाने मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आठ दिवसात संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. बैठकीत संबंधित विषय संचालक मंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. – डाॅ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे</strong>

हेही वाचा >>>पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन

निर्णय रद्द करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मार्केट यार्डात मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. बाजार समितीच्या संचालक मंडळांनी मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करण्याची सूचना फडणवीस यांनी केली, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. या भागात दाट वस्ती आहे. मासळी बाजारामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या भावना मी फडणवीस यांच्यापर्यत पोहचविल्या. फडणवीस यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना मासळी बाजाराचा निर्णय रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मिसाळ यांनी सांगितले.