प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हरिश प्रेमकिशन पवार (वय २४, रा. लष्कर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे : बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

हरिशच्या आईने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिश विवाहित आहे. आरोपी तरुणीने हरिशची मैत्री केली होती. हरिश विवाहित असल्याची माहिती तरुणीला होती. तिने हरिशशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. हरिश आणि त्याच्या पत्नीत दुरावा यावा म्हणून तिने हरिशच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

हेही वाचा- संशोधन संस्थेतील प्रसाधनगृहात युवतीचे मोबाइलवर चित्रीकरणाचा प्रयत्न; पसार आरोपीचा शोध सुरू

हरिश एका खासगी कंपनीत काम करत होता. तरुणी हरिशच्या कामावर जाऊन त्याला त्रास देऊ लागली. मी सांगेल त्याप्रमाणे वागायचे, असे सांगून तिने हरिशला धमकावले होते. तरुणीच्या त्रासामुळे हरिशने कल्याणीनगर येथील पुलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली, असे हरिशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हरिशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.