पुणे : मोबाईल गेम खेळण्याच्या आमिषाने आठ वर्षांच्या मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे हादरवणाऱ्या राठी हत्याकांडातील आरोपीची मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; सात जणांची निर्घृण हत्या

हेही वाचा – पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती

या प्रकरणी माऊली रामभाऊ अडागळे (वय ३८, रा. मोरे बिल्डिंग, वाघोली, नगर रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या आठ वर्षांच्या मुलाला आरोपी अडागळेने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखविले. आरोपीने त्याला घरात नेऊन त्याच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलाने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor boy was molested by luring him to play mobile games pune print news rbk 25 ssb