पुणे : आंबिल ओढा वसाहत परिसरातील साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला मंगळवारी किरकोळ आग लागली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने आगीचा उद्रेक वाढला नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.
हेही वाचा – जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे हे गणेश मंडळ आहे. या मंडळाने यंदा उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी गणपतीच्या आरतीसासाठी आले असताना देखाव्याच्या कळसाला किरकोळ आग लागली. आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच कार्यकर्त्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नड्डा यांना आरती सोडून जावे लागले. दरम्यान, जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने आग संपुष्टात आली. दरम्यान, या मंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.