पुण्यातील येरवडा भागात राहणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सावत्र आई आणि वडील हे सतत मानसिक, शारीरिक त्रास देत असायचे. या त्रासाला कंटाळून धावत्या रेल्वेमधून उडी मारून तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपी वडिलाने आरोपी सावत्र आईशी लग्न केले. त्यानंतर वडील आणि सावत्र आई हे दोघे मृत मुलीला घरातून बाहेर पडू देत नव्हते. तिला शिक्षण घेऊ देत नव्हते आणि मारहाण करीत होते. या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. त्याचदरम्यान सर्व कुटुंबीय गुलबर्गा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून सर्वजण पुण्याच्या दिशेने रेल्वेमधून प्रवास करीत होते. दौंडपर्यंत रेल्वे आल्यावर मुलीने धावत्या रेल्वेमधून उडी मारली.

हेही वाचा – पुणे : सिंहगड रस्ता भागातील विक्रेत्यांकडून खंडणी घेणारे चार गुंड तडीपार; धमकाणारे गुंड तडीपार

या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडील आणि सावत्र आईविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl living in yerawada area of pune committed suicide svk 88 ssb
Show comments