लोणावळा : अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या एकास लोणावळा पोलिसांनी अटक केली. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी दीपक संजय सोनवणे (वय २८, रा. तुंगार्ली, लोणावळा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोनवणे याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून लोणावळ्यातील रेल्वेच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीला सोडून सोनवणे पसार झाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सोनवणेला अटक केली. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश बावकर तपास करत आहेत.