लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुण्यात बहिणीकडे राहण्यास आलेल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात १३ वर्षीय पीडीत मुलीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…. पिंपरी: वाकडमधील ओढ्यात सांडपाणी सोडू नका; आमदार अश्विनी जगताप यांची प्रशासनाला सूचना
पीडित मुलगी तिच्या मोठ्या बहिणीकडे तीन महिन्यांपूर्वी राहण्यास आली होती. बहीण दत्तवाडी भागात राहत होती. दरम्यान, बहिण घरी नसताना त्याने अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केले. पीडित मुलीने बहिणीला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एकास अटक केली असून दत्तवाडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.