येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी एका रुग्णाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत प्रादेशिक मनोरुग्णालयातील पर्यवेक्षकांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका रुग्णाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन

संशयित आरोपीवर गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुललाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलावर संशयित आरोपीने अत्याचार केले. मुलाने आरडाओरडा केल्यानंतर रुग्णालयातील रक्षकांनी कक्षात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.