पुणे : येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल सुधारगृहातून पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेने पकडले. अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांनी लोणावळा परिसरात एकावर वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

हेही वाचा – पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर ग्राहकांवरुन दोन दुकानांतील कामगारांमध्ये हाणामारी; कामगारांना पोलिसांकडून चोप

गेल्या महिन्यात ३० जानेवारी रोजी येरवड्यातील बाल सुधारगृहातून आठ मुले पसार झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने पसार झालेल्या सहा मुलांना पकडले होते. उर्वरित दोघांचा शोध घेण्यात येत आहे. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा पुणे रेल्वे स्थानकातून परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस कर्मचारी निलेश साबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, निलेश साबळे, शशिकांत नरुटे, शुभम देसाई, विठ्ठल साळुंके आदींनी ही कारवाई केली.