केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रकार केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने शनिवारी रात्री उघडकीस आणला. या प्रकरणी एकास संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. सोमेश धुमाळ असे संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- अमित शहा यांच्या संवादामुळे काश्मिरी मुले आश्वस्त; काश्मिरमध्ये ‘अमन’ आणि विकासासाठी भरीव तरतूद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन शहरात शनिवारी (१८ फेब्रुवारी) झाले. सायंकाळी सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हाॅटेलमध्ये काश्मिरमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांशी अमित शहा यांनी संवाद साधला. या कार्यक्रमात दाखल होण्यापूर्वी शहा यांच्या ताफ्यात एकाने मोटार घालण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगून त्याने मोटार घातली.

हेही वाचा- “धोका देणाऱ्यांना कधी सोडायचं नसतं”, अमित शहा यांच्याकडून शिवसेनेचा समाचार

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे ताफ्यातील मोटारींची यादी होती. यादीत धुमाळ याच्या मोटारीचा वाहन क्रमांक नव्हता. संशयावरुन धुमाळ याला ताब्यात घेण्यात आले. चतु:शृंगी पोलिसांकडून धुमाळ याची चौकशी करण्यात येत आहे.

Story img Loader