पुणे: येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कारागृह प्रशासनावर ताण पडत आहे. येरवडा कारागृहाच्या आवारात नवीन कारागृह बांधण्यात येणार आहे. नवीन कारागृहात तीन हजार कैद्यांची क्षमता असणार आहे. नवीन कारागृह बांधण्यात येणार असल्याने कारागृहातील गुंड आणि चोरट्यांसाठी आता ऐसपैैस जागा उपलब्ध होणार आहे. गृहविभागाने नवे कारागृह बांधण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे गुंडांसाठी खुशखबर ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कडक सुरक्षा व्यवस्था भेदून कैद्यांपर्यंत मोबाइल संच पोहोचले आहेत. कैद्यांकडे अमली पदार्थ सापडण्याच्या घटना घडल्या होत्या. कैद्यांची आत्महत्या, तसेच संशयास्पद मृत्यूबाबत महादेव जानकर आणि डाॅ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्याचा ताण कारागृहातील यंत्रणेवर पडत आहे. कारागृहाच्या आवारात नवीन कारागृह बांधण्यात येणार आहे. नवीन कारागृहाची क्षमता तीन हजार कैद्यांची आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहासाठी विविध संवर्गात ३६४ पदे मंजूर झाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा… सरकारच्या दबावामुळे राजीनामासत्र! मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या पदत्यागानंतर माजी सदस्यांसह विरोधकांचा आरोप

येरवडा कारागृहातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कारागृह सुरक्षेसाठी सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. कारागृह प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कैद्यांकडील मोबाइल जप्त केले होते. मात्र, कैद्यांकडे अमली पदार्थ सापडणे, तसेच कैद्यांचे संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याची बाब खरी नाही. येरवडा कारागृहातील २६ कैद्यांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि संशयास्पद वर्तन असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली, प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

रुबी हाॅल रुग्णालय गैरव्यवहाराची चौकशी

रुबी हाॅल क्लिनिकमध्ये मूळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी उत्पन्न दाखवून धर्मादाय आयुक्तांची फसवणूक केल्याची आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. रुबी हाॅल क्लिनिकच्या वानवडी आणि हिंजवडी येथील रुग्णालयाने दिलेल्या विवरण पत्रात तफावत दिसून आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

येरवडा कारागृहाच्या आवारात नवीन कारागृह बांधण्यात येणार आहे. नवीन कारागृहाची क्षमता तीन हजार कैद्यांची आहे. नवीन कारागृहात कैद्यांसाठी बराकी बांधण्यात येणार आहेत. – अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new jail will be constructed on the premises of yerawada jail pune print news rbk 25 dvr
Show comments