शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ‘स्वच्छ’ संस्थेची कचरा संकलन व्यवस्था निर्माण करण्यासाठी नवा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संस्था, पुणे महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकेंद्रीत बायोमिथेन प्रकल्प सुरू करण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे असंघटित क्षेत्रातील कचरा वेचकांसाठी पुर्नप्रक्रिया क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

हेही वाचा – पुणे : मिरची, फ्लॅावर, गवार महागली ; ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात घट

या प्रकल्पासंदर्भात जैववैद्यकीय, प्लास्टिक आणि रासायनिक कचरा क्षेत्रावर आधारीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत कामगार संस्थांचे महत्त्व, सामाजिक आणि आर्थिक कार्य, कचरा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने तसेच कायदेशीर बाबींबाबत चर्चा करण्यात आली. सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने कचरा व्यवस्थापन कसे करावे याबाबत गटचर्चा करण्यात आली. त्याबाबतचे सादरीकरणही करण्यात आले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कचरा संकलन ते वाहतूक अशा दैनंदिन कामाचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय विषयक आरोग्य आणि सुरक्षा दृष्टीकोनातून निरीक्षण करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : दत्तवाडीत पादचाऱ्याला लुटणारे गजाआड

कचरा संकलन करताना पुरेशी साधने आणि उपकरणे मिळत नाहीत. पूरक सेवांचाही अभाव जाणवतो त्यामुळे कार्यशाळेच्या माध्यमातून कमीत कमी उपकरणांमध्ये कशी सुधारणा करण्यात येण्याबाबतचे उपाय शोधण्यात आले, असे स्वच्छ संस्थेतील कचरा सेवक राणी शिवशरण यांनी सांगितले. प्रकल्पाची सुरुवात कचरावेचक आणि निगडीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणातून झाली आहे, ही समाधानकारक बाब आहे, असे मत स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे यांनी व्यक्त केले.

Story img Loader