पुणे: अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या पायाचा बराचसा भाग तुटला. त्याचा मणका आणि खांद्याला दुखापत होऊन यकृतालाही जखम झाली होती. अशा रुग्णावर तीन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभे केले आहे.

रस्ते अपघातात एका ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या पायाचा बराचसा भाग तुटलेला होता. त्याचा मणका आणि खांद्यालाही दुखापत झाली होती. यकृतालाही जखमी झाल्याने अंतर्गत रक्तस्राव होत होता. रुग्णाचा पायाचा भाग केवळ एका नसेच्या आधारे जोडलेला होता. त्यामुळे बाणेरमधील मणिपाल रुग्णालयातील डॉ. विनायक घनाटे आणि त्यांच्या चमूने तत्काळ शस्त्रक्रिया करुन रुग्णाचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

हेही वाचा… राज्यातील १ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविम्याचे संरक्षण, सहा लाख कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी प्रलंबित

या रुग्णावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्याचा पाय तात्पुरत्या स्वरुपात जोडून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्याच बरोबर रुग्णाला ७२ तासांसाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्याच्या मेंदू आणि यकृतातील रक्तस्राव थांबल्यानंतर रुग्णावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तुटलेल्या हाडांवर स्क्रूज आणि प्लेटच्या माध्यामातून करण्यात आली. त्यानंतर प्लॅस्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ.संदीप नाफडे यांच्या मदतीने तिसरी शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या पायाच्या पेशी आणि नसा काळजीपूर्वक जोडल्या. मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक रमण भास्कर, डॉ. विनायक घनाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रुग्णाला अतिशय गंभीर आणि बेशुध्दावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याचा जीव वाचविणे आणि शरीरापासून पूर्ण वेगळा झालेला पाय जोडण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळे तीन टप्प्यांत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णानेही उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला. आता रुग्ण त्याच्या पायावर उभा राहू शकतो. – डॉ. विनायक घनाटे, मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेर