पुणे : पोलिसांच्या मोटारीच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : दोन टोळक्यांचा कोयते, दांडके मिरवत धुडगूस; रिक्षा, दुचाकींची तोडफोड

हेही वाचा – पुणे : विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये राडा; कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

गजानन रत्नाकर शिंदे (वय ७७, रा. श्रीराम अपार्टमेंट, पोरवाल पार्क, शांतीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकलस्वार शिंदे विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय परिसरातून निघाले होते. त्यावेळी पोलिसांची माेटार तेथून भरधाव वेगाने निघाली होती. सायकलस्वार शिंदे यांना मोटारीने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यंच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी तपास करत आहेत.

Story img Loader