पुणे : खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीस होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीत गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली.
हेही वाचा – आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी
हेही वाचा – गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अस्मार यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नाेंद करण्यात आली आहे.