पुणे: मोक्का कारवाई केलेल्या गुंडाने येरवडा कारागृहात पोलीस शिपायावर हल्ला केला. पोलीस शिपायावर पत्र्याच्या तुकड्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ऋषभ उर्फ सनी शेवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे: ऑनलाइन ॲपवर झालेली ओळख महागात; महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

हेही वाचा – ‘सिटी टास्क फोर्स’ कागदावरच, राज्य शासनाकडून महापालिकेला स्मरणपत्र

याबाबत पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ शेवाळे आणि साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. शे‌वाळे आणि साथीदारांना येरवडा कारागृहात आणण्यात आले. कारागृहातील सर्कल क्रमांक एकच्या परिसरात शेवाळेने त्याच्याकडील पत्र्याच्या तुकड्याने जगताप यांच्यावर हल्ला केला. कारागृह रक्षकांनी त्याला पकडले. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.