पुणे : किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी पाच जणांविरूद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> कोयत्याने वाढदिवसाचा केक कापणे एकाला पडले महागात, रवानगी थेट तुरुंगात

याप्रकरणी कालिदास खांदवे, माऊली खांदवे (रा. लोहगाव) यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत पोलीस कर्मचारी पी. आर. मोटे हे गंभीर जखमी झाले आहेत. मोटे हे विमानतळ पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. त्यांनी धानोरी जकात नाका परिसरात मोटार लावली होती. त्यांच्या मोटारीजवळ खांदवे यांनी दुचाकी लावली होती. मोटे यांनी खांदवे याला दुचाकी काढण्यास सांगितले. त्यानंतर खांदवे याने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. खांदवे आणि त्याच्या साथीदारांनी मोटे यांना मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत मोटे गंभीर जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करत आहेत.

Story img Loader