पुणे-सोलापूर महामार्गावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात एक खासगी बस उलटल्याने १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुण्याकडून सोलापूर मार्गे तेलंगणाच्या दिशेने जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस रात्री नऊच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. एका दुसऱ्या वाहनाला बसची धडक होऊ नये यासाठी अचानक ब्रेक लावावे लागले आणि त्यामुळे बस उलटली अशी प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले होत तात्काळ मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. महामार्गावर एका ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली होती, ढाब्यात जेवण केल्यानंतर सर्व बसमध्ये परतले, त्यानंतर बस दुसऱ्याने चालवायला घेतली अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी बस खूप वेगात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A private travel bus terrible accident on the pune solapur highway pune print news rbk 25 ysh