पुणे : भोर तालुक्यातील पसुरे गावात कुंपण टाकण्याच्या वादातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने ग्रामस्थांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचे चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने बंगला (फार्म हाऊस) बांधला आहे. लष्करी अधिकारी वाकड भागात राहायला आहे. बंगल्याच्या परिसरात खांब, तसेच कुंपण बांधण्यावरुन लष्करी अधिकाऱ्याचा ग्रामस्थांशी वाद झाला. त्यानंतर अधिकाऱ्याने त्याच्याकडील बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. ग्रामस्थांना धमकावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केल्याचे चित्रीकरण मोबाइलवर ग्रामस्थांनी केले. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली.

हेही वाचा – राज्यात पुन्हा गारपिटीची शक्यता, कोणत्या जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा?

हेही वाचा – उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल काय सांगतो?

याबाबत भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.