Loksatta Pune Vardhapan 2023 : कोविड महामारी ही मानवी जीवनातली एक मोठी शोकांतिका म्हणता येईल. लॉकडाऊन, हँडवॉश, मास्क, आरटीपीसीआर यांसारख्या संज्ञा सामान्यांनाही परिचित करून देणारी ही महामारी परत कधीही येऊ नये अशीच सर्व जण प्रार्थना करतील. औषधांची, लशीची चणचण, अपुरी ऑक्सीजन यंत्रणा यामुळे तर याची तीव्रता अधिक भासू लागली. यामुळे का होईना, लोकांना संशोधनाचे महत्त्व कळायला लागले आणि त्यांच्या आशा संशोधन प्रयोगशाळांवर खिळल्या. या संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नात संशोधन प्रयोगशाळांनीही मोठा वाटा उचलला.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

संशोधन ही जागतिक संकल्पना असली तरी पुण्यातील विज्ञान संशोधन कम्युनिटी ही त्यात आघाडीवरच राहिली. स्थानिक, राष्ट्रीय आणि काही बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. नवीन लशी, जुन्या औषधांचा सुयोग्य वापर, निदान पद्धती अशा विविध क्षेत्रांत पुण्यातील प्रयोगशाळा आघाडीवर राहिल्या. नवीन वैज्ञानिक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या सज्ज झाल्या. त्यामुळे नवीन पुणे या संकल्पनेखाली पुण्यातील विज्ञान संशोधनाचा आणि प्रयोगशाळांचा आढावा घेणे निश्चितच मनोरंजक आणि मार्गदर्शक ठरेल. म्हणूनच नवीन पुण्यातील विज्ञान संशोधनाचा हा धांडोळा. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की संशोधन ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचे कालानुरूप भाग पाडणे कठीण असते.

विद्येचे माहेरघर आयटी हब याचबरोबर पुण्याची नवीन ओळख ही संशोधन केंद्राची एक राजधानी असेही करता येईल आणि त्याचे कारण म्हणजे पुण्यात असलेला विज्ञान संशोधनांचा ब्रॉड स्पेक्ट्रम. आरोग्य, शेती, अभियांत्रिकी, वातावरणाचा अभ्यास, जैविक खते, औद्योगिक रसायने, संरक्षण आयुधे, स्फोटके, खगोलशास्त्र, संगणक अशा बहुविध प्रयोगशाळांची मालिकाच पुण्याला उभी राहिली आहे. आवश्यक असणारी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि संशोधनपूरक वातावरण यामुळे या प्रयोगशाळा नवीन पुण्यातही आपली प्रगती अशीच चालू ठेवतील यात शंकाच नाही.

आरोग्यक्षेत्रच घ्या ना! सीरम, भारत बायोटेक, जिनोव्हासारख्या संस्थांनी पुण्याला लस निर्माण क्षेत्रात जागतिक नकाशावर ठेवण्याचे काम केले आहे. स्वस्त आणि अधिक निर्धोक परिणामकारक लस निर्मिती हे त्याचे संशोधन चालूच आहे. अर्थात त्याला लागणारी पूरक व मूलभूत संशोधनाची जबाबदारी उचललीय ती एनआयव्ही आणि एनसीसीएस सारख्या संस्थांनी. लस उत्पादनाला सामान्यत: सात-आठ वर्षे लागतात. त्या दृष्टीने आहे त्या लशी परिपूर्ण बनवणे, नवीन आरएनएवर आधारित लशी करणे हेही पटलावर आहेच. त्यासाठी नव्या प्रकारचा जनुकीय आराखडा तयार करणे, कोविडबरोबरच डेंग्यू, स्वाईन फ्लू अभ्यासाला एनआयव्हीचे प्राधान्य राहील. यालाच पूरक असे स्टेमसेल उपचार पद्धती, विकसन मधुमेह, कर्करोग यावरच्या सुलभ औषध निर्मितीसाठी आवश्यक पेशीविज्ञान, मानवी गुणसूत्रे हा राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेच्या अभ्यासाचा गाभा आहे. या सर्व अभ्यासासाठी सुसज्ज जीव-माहितीशास्त्र विभाग असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे विविध संशोधन आडाखे बांधणे सुलभ होऊन प्रत्यक्ष संशोधन मार्ग सुलभ होतो. याशिवाय औषधे, पर्यावरणपूरक नवनिर्माण पद्धती विकसित करणे, नवीन औषधे शोधून काढण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा सारखी संस्था वाटचाल करतेय. विशेष उल्लेख करायला हवा तो फ्लो केमिस्ट्री वापरून किफायतशीर आणि पर्यावरणपूरक रसायन निर्मितीचा. ही पद्धत रसायन उद्योगात गेमचेंजर ठरणार याबद्दल शंकाच नाही. नैसर्गिक स्रोतापासून औषध निर्मिती, जनुकीय आधारित नवीन वैज्ञानिक पद्धती यावरचे संशोधनही वेगाने विकसित होतेय.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नाटक ‘आपलं’ होण्यासाठी…

नवीन पुण्याला अभिमानास्पद गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवरील लायगो व सर्न या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्याचा सहभाग. लायगो हा अनेक अग्रगण्य भारतीय संशोधन संस्था आणि अमेरिकेतील लायगो प्रयोगशाळेचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे हिंगोली येथे १२.६ अब्ज डॉलर्स खर्च करून गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठीची वेधशाळा (ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्टर ऑब्झर्वेटरी) तयार करण्यात येणार आहे. गुरुत्वीय लहरींचे मूळ शोधणे आणि त्यांचे शोधतंत्र विकसित करणे, १०० वर्षांपूर्वी आइनस्टाइनने भाकित केलेल्या विषयाची पुष्टी करणे आणि विश्व निर्मितीचे गूढ उकलणे यात पुण्याची आयुका अग्रभागी आहे. विश्वनिर्मिती उलगडण्याच्या प्रयत्नातला सीईआरएन हा आणखी एक प्रकल्प स्वित्झर्लंडमधील पार्टिकल अॅक्सिलरेटर यंत्रणा वापरून पुण्यातील आयसरमध्ये याचे संशोधन चालू आहे. भावी काळात या प्रकल्पावर पुण्याची मुद्रा असणार, हे भूषणास्पद आहेच.

संरक्षण सिद्धतेला आत्मनिर्भर करण्यात महत्त्वाचा भाग आहे तो पुण्याच्या आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचा. पृथ्वी मिसाईल, ५०० किलोचा फ्रॅग्मेंटेड बॉम्ब, अर्जुन रणगाडे, कोणत्याही वातावरणात वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे या विषयींचे सखोल संशोधन, डिझाइन आणि उत्पादन इथे केले जाते. यासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे प्रकल्प हा आत्मनिर्भरतेकडे भारताची वाटचालच दर्शवतो. त्यासाठी लागणारी रसायने तयार करण्यासाठी शेजारची एचईएमआरएल ही सिद्ध आहेच.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५

शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक अशी हवामान प्रयोगशाळा भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) ही पुण्यातच आहे.विशेषत: दूषित घटकांची सतत देखरेख करण्याची अद्ययावत यंत्रणा विकसित करणे, जागतिक पातळीवर मान्सूनचे भाकीत करण्याचे मुख्य कार्यालयही इथेच आहे. वातावरणातील आकस्मिक बदलांचा अभ्यास करणे या नित्य कामाबरोबरच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करणे आणि सर्वात मुख्य म्हणजे आवश्यक अतिप्रगत संगणक प्रणाली (एचपीसी) विकसित करणे यामुळे ही संस्था जगाच्या नकाशावर आली आहे.

माहिती तंत्रज्ञानातील संशोधनातही पुण्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक कंपन्यांशिवाय पुण्यात बऱ्याच छोट्या प्रयोगशाळांमध्ये व बऱ्याचशा महाविद्यालयांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि आयओटी सारख्या सर्वश्रृत विषयांवर संशोधन चालते. याशिवाय डेटा सायन्ससाठी आयसरने केंद्रच उघडले आहे. यंत्रमानव निर्मिती संशोधनातही पुण्याचा मोठा भाग आहे. अपारंपरिक ऊर्जा उत्पादन, सौरघट, इलेक्ट्रिकल वाहने अगर मोबाईलमध्ये लागणाऱ्या बॅटरी, त्याकरिता लागणाऱ्या रसायनांची निर्मिती या क्षेत्रांतही पुण्यातल्या अनेक कंपन्या सीमेट, आयसर हे शिवधनुष्य पेलताना दिसतात.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे व्हावे ‘ई-सिटी’!

याशिवाय पुण्यात अनेक क्षेत्रांत आपली जागतिक मुद्रा उमटवणाऱ्या प्रयोगशाळा आहेतच. आघारकरमध्येही प्रामुख्याने नॅनो कणांचे उत्पादन जिवाणू वापरून केले जाते. सीडब्ल्यूपीआरएसमध्ये पाणीविषयक, तर द्राक्ष, ऊस संशोधनातून नवीन कीटकमुक्त वाण विकसित करण्याचे संशोधन केले जाते. वाहन क्षेत्रातला आघारकर संशोधन संस्था, तसेच पुण्यातली विद्यापीठे वेगवेगळ्या शास्त्रांत संशोधन करून पुण्याला आपापल्या क्षेत्रात जागतिक नकाशावर ठेवण्यात यशस्वी झाली आहेत.

गेल्या काही वर्षांतला आणखी एक उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बदल म्हणजे इन्क्युबेशन पार्क, व्हेंचर सेंटर आणि स्टार्टअप. पदवी झाल्यावर आपल्या मनातल्या शास्त्रीय संकल्पना पडताळून पाहण्याची संधी आता उपलब्ध आहे. नोकरी घेणाऱ्याच्या बदली नोकरी देणारे या मानसिक भूमिकेतला बदल स्वागतार्ह आहेच. त्यामुळे संशोधनाला फारच पुढावा मिळाला आहे. शास्त्रज्ञांनी स्वविकसित तंत्रावर आधारित स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याला प्रोत्साहन दिल्याने ट्रान्सलेशनल रीसर्च आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. रक्ततपासणीतून कॅन्सर निदान, बुरशीआधारित जैविक कीटकनाशक निर्मिती अशी अनेक उदाहरणे देता येतील. संशोधन क्षेत्राला मिळालेले हे पुणेरी बालामृतच आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण

सारांश काय, योग्य त्या मनुष्यबळाची उपलब्धता, आर्थिक संस्थांकडून मिळणारा वेळेवर वित्त पुरवठा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि मुख्य म्हणजे संशोधनाला आवश्यक पोषक व उत्साहवर्धक वातावरण यामुळे नवीन पुणे हे जागतिक संशोधन नकाशावर राहील, यात संशय नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करायला हवा जागतिक पातळीवर बदलत चाललेल्या विज्ञान संकल्पनेचा, संशोधन आणि त्याला आवश्यक असलेल्या शिक्षण पद्धतीचा. एकशाखीय संशोधनाकडून बहुशाखीय संशोधनाचा. ही संकल्पना जरी काही वर्षांपासून चर्चित असली तरी पुढील काळात ती बुलेट ट्रेनच्या वेगाने विकसित होणार आहे. गेल्या काही वर्षांतील नोबेल पारितोषिकांचा विचार केल्यास ही गोष्ट लक्षात येईल. वैद्यकीय शाखेतील मान रसायनशास्त्रज्ञांना मिळालाय आणि उलटही घडलंय. दोन्ही पूरक शाखांनी पहिल्या दिवसापासूनच (संशोधक, अभियंते यांनी) एकत्र येऊन प्रकल्पाची आखणी करायला हवी. बायोमेडिकल इंजिनिअरिंग या आताशा काहीशा स्थिरावलेल्या शास्त्राद्वारे आवश्यक वैद्यकीय उपकरणांची निर्मिती हे त्याचे उत्तम उदाहरण. अभिमानाची गोष्ट ही, की नवीन पुणे या क्षेत्रातही अग्रेसर राहील.

आयसरसारख्या संस्थेत बायोलॉजिकल मॅथ्स, मॅथेमॅटिकल फिजिओलॉजी, बायो कॉम्प्युटेशन, मटेरियल सायन्स, नॅनो सायन्ससारख्या आंतरशाखीय विषयात शिक्षण, संशोधन चालते. भावी काळात याची व्याप्ती वाढणार आणि पुढची पायरी म्हणजे विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांच्या एकत्रित अभ्यासाची. पुण्यात डेक्कन कॉलेज भांडारकर संस्था हे विषय हाताळायला समर्थ आहेत. पुण्यातील आयसर, एनसीएल, एनआयव्ही, एनसीसीएस, सीएमईटी, आयुका, एआरआयसारख्या अग्रगण्य संशोधन संस्थेत आता ही संकल्पना बऱ्यापैकी रुजलीय. आणखी एक बदल म्हणजे मूलभूत संशोधनाचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्याची गती वाढली आहे. शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे. समाजोपयोगी तंत्रज्ञान ही भावी काळाची गरज आहे. कारण विज्ञानाचा मूळ उद्देश समाजजीवन सुलभ करणे हाच आहे. नवीन वैज्ञानिक पुणे हे आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहे, यात शंका नाही.

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत)

Story img Loader