पुणे : पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षाचालक संदीप काळे यांनी शरद पवार यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. साहेब आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. काल मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांचा निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असून, त्यांच्याकडून राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात काळे यांनी शरद पवार यांना रक्ताने पत्र लिहून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

Ajit pawar on Assembly Election 2024
Ajit Pawar: ‘महायुतीत असलो तरी…’, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Rohit Pawar Nitin Gadkari
रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
IMA Chief Write Letter
Kolkata Rape Case : “डॉक्टरांना जगू द्या…”, कोलकाता बलात्कार प्रकरणी IMA च्या अध्यक्षांचं भावनिक पत्र!
Ajit Pawar Faces BJP Protest
Ajit Pawar : महायुतीत अनागोंदी? पुण्यात अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे; मिटकरींनी थेट फडणवीसांकडे खुलासा मागितला

हेही वाचा – पुणे: मेट्रोची मुख्य सल्लागारांवर ३६८ कोटींची खैरात; ‘कॅग’च्या अहवालात ताशेरे

संदीप काळे म्हणाले की, मी मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून एक रिक्षाचालक आहे. आजवर शरद पवार साहेबांना अनेक वेळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून सामाजिक काम करण्यासाठी ऊर्जा मिळत राहिली. आजपर्यंत शरद पवार यांनी लाखो कार्यकर्ते घडवले असून, त्यापैकी मी एक आहे. त्यामुळे काल अचानकपणे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तो माझ्यासह सर्वांनाच धक्का देणारा निर्णय ठरला. त्यानंतर रक्ताने पत्र लिहून आपल्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा. आपण अध्यक्ष पदावर कायम राहावे आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करित राहावे, असा मजकूर लिहिल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार नक्कीच निर्णय मागे घेतील, अशी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.