पुणे : कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. शुभम बाळू इंगोले (वय १६, रा. ढोणे हाइट्स, शिंदे पुलाजवळ, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शुभम हा शिवणे भागातील नवभारत हायस्कूलमध्ये दहावीत होता. तो सकाळी अकराच्या सुमारास शाळेत निघाला होता.

शिवणे भागताील देशमुखवाडी परिसरातील छोट्या गल्लीतून तो मित्राकडे जात होता. तेथील एका कुंपणाच्या लोखंडी जाळीत वीजप्रवाह उतरला होता. शुभमने जाळीला स्पर्श केला आणि विजेचा धक्का बसून तो कोसळला. त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

Rangava dies in accident in Sangamner news
संगमनेर मध्ये प्रथमच आढळला रानगवा, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू !
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Story img Loader