भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. या प्रकरणी संगणक अभियंता मोटारचालकास अटक करण्यात आली.रिया उमेश पवार (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचेे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालक अमितकुमार संजय प्रधान (वय ४१, रा. कुमार पेरिविकल सोसायटी, खराडी) यांना अटक करण्यात आली. रियाचे वडील उमेश बंडू पवार (वय ३९) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमितकुमार मगरपट्टा सिटीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरेंच जनआक्रोश आंदोलन 

दुचाकीस्वार उमेश आणि त्यांची मुलगी रिया दुचाकीवरुन खराडी भागातून जात होते. त्या वेळी शितळादेवी मंदिर चौकात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या रियाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोटारचालक प्रधान यांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.