पुणे : राज्यात वाहन चालवण्याच्या पक्क्या परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीत सर्व निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. वाहन परवाना चाचणी सरासरी एका मिनिटात उरकली जात असून, किमान निकषांचे पालन न करता परवाना दिला जात आहे. दरम्यान, योग्य पद्धतीने चाचणी न घेता परवाना दिला जात असल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

राज्यात ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आहेत. परिवहन विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२२ या कालावधीत राज्यात वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २.४ टक्के आहे. १४ आरटीओंमध्ये वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. फक्त सहा आरटीओंमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक आहे. वाहन परवाना चाचणीसाठी मोटार वाहन कायद्यानुसार २४ निकष आहेत. हे सर्व निकष आरटीओकडून पाळले जात नाहीत. पक्क्या परवान्यासाठी ही चाचणी अगदी चुटकीसरशी घेतली जात आहे. वाहन परवाना चाचणीचा सरासरी वेळ दुचाकीसाठी १६ ते २० सेकंद, मोटार व रिक्षासाठी १ मिनिट आणि जड वाहनांसाठी ३ मिनिटे आहे.

Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
nashik ang robbed an onion trader in bus parked at the Mela bus station
बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी,जीएसटी कार्यालयाकडून तक्रार; दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – पुणे महापालिकेचा अजब कारभार; एनएचएआयने केलेला गुळगुळीत रस्ता महापालिकेने गुपचूप रात्रीत खोदला

वाहन चालवण्यासाठी सुरुवातीला सहा महिन्यांसाठी शिकाऊ परवाना दिला जातो. नंतर पक्क्या परवान्यासाठी प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते. पुण्यात मोटारीचा वाहन परवाना प्रथमच घेत असल्यास वाहन चालन व प्रशिक्षण संस्थेतील (आयडीटीआर) ट्रॅकवर ही चाचणी होते. तसेच आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथे दुचाकी, तीन चाकी आणि इतर जड वाहनांच्या परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. मोटारीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्यासाठी आळंदीतील ट्रॅकवर पुन्हा चाचणी द्यावी लागते.

याबाबत ‘३ए रोड सेफ्टी फाउंडेशन’चे संचालक विजयकुमार दुग्गल म्हणाले, की वाहन परवाना चाचणीसाठी २४ निकष असताना केवळ तीन ते चार निकषांच्या आधारे परवाना दिला जात आहे. आरटीओकडून एकप्रकारे वाहन चालवण्याचे कौशल्य नसलेल्या व्यक्तींच्या हाती वाहने सोपवली जात आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. कौशल्य नसलेल्या चालकांना परवाना दिला जात असल्याने सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.

पुण्यात एक टक्काच उमेदवार अनुत्तीर्ण

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे मागील वर्षी २०२२ मध्ये २ लाख २७ हजार ८१८ जणांनी पक्क्या वाहन परवान्यासाठी अर्ज केले. त्यातील २ लाख २७ हजार २५१ जणांनी चाचणी परीक्षा दिली, तर ५६७ जण चाचणीसाठी अनुपस्थित राहिले. चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी २ लाख २४ हजार ८८२ जण उत्तीर्ण झाले आणि २ हजार ३६९ उमेदवार अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे एक टक्का आहे.

वाहन चालन व प्रशिक्षण संस्थेच्या निकषानुसार वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी चाचणी घेतली जात आहे. मोटार वाहन कायद्यातील सर्व निकषांचे पालन करण्यात येत आहे. योग्य पद्धतीने चाचणी घेऊनच वाहन चालवण्याचा परवाना दिला जात आहे. – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

हेही वाचा – किवळे होर्डिंग दुर्घटनेतील पाच बळींची जबाबदारी कोणावर?

पुण्यात पक्क्या वाहन परवाना चाचणीसाठी सरासरी वेळ

  • दुचाकी : १६ ते २२ सेकंद
  • रिक्षा : १ मिनिट
  • मोटार : १ मिनिट
  • जड वाहने : ३ मिनिटे

राज्यातील वाहन परवाना चाचणीचा निकाल

वर्ष अर्ज उत्तीर्ण अनुत्तीर्ण
२०१७९.२६ लाख८.९६ लाख१९ हजार
२०१८१८.७१ लाख १८.२१ लाख३५ हजार
२०१९ १९.९३ लाख१९.१८ लाख६२ हजार
२०२० १६.४९ लाख१५.९९ लाख ४२ हजार
२०२१२४.३९ लाख२३.७६ लाख ५३ हजार
२०२२३१.९६ लाख३१.०७ लाख७६ हजार

Story img Loader