पुणे : मुलगा न झाल्याने जुळ्या मुलींचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. न्यायालयाच्या आदेशाने वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, आजोबा बाबासाहेब, आजी जयश्री, काका अमोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोभे यांची बहीण उर्मिला यांचा २०१८ मध्ये अतुल याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगा हवा. मूल गोरे हवे, असे आरोपींनी उर्मिलाला सांगितले. दरम्यान, उर्मिला गर्भवती झाल्या. त्यांना रिद्धी आणि सिद्धी दोन जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सिद्धीला आरोपींनी बाहेरील दूध पाजले. दूध पाजल्यानंतर ती अत्यवस्थ झाली. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा – लोणावळ्यात धो धो… ४८ तासांत ४३४ मिलिमीटर पावसाची नोंद
६ फेब्रुवारी २०२० रोजी रिद्धीला बाहेरील दूध पाजले. रिद्धीचा मृत्यू झाला. रिद्धी आणि सिद्धी यांचा मृत्यू बाहेरील दूध पाजून झाला. दूधात काहीतरी मिसळल्याचा संशय उर्मिलाचा भाऊ लोभे यांना होता. त्यानंतर लोभे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी खून, कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना नुकतेच दिले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.