दुकानातील ताडपत्री चोरणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने दुकानदाराला गजाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत घडली.
दुकानदाराचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आरिफ शेख, आकाश रजपूत (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमीर फारूख शेख (२३, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अमीर यांचा ताडपत्री विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी आरिफ आणि आकाश दुकानाजळ थांबले होते.

हेही वाचा >>>मोकाट श्वान, पुणेकर हैराण ! ; श्वानांच्या संख्येबाबत महापालिका अनभिज्ञ

दोघांनी अमीर यांच्या दुकानातून ताडपत्री चोरल्याचे शेजारी असलेल्या दुकानदाराने पाहिले. याबाबतची माहिती अमीर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी आरिफ, आकाश यांना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी अमीर यांना गजाने बेदम मारहाण केली.या घटनेत अमीर गंभीर जखमी झाला. आरोपी अरिफ आणि आकाश पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.

Story img Loader