पुणे : लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर वेताळ टेकडीतून जाणारा प्रस्तावित बालभारती पौड फाटा रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

या रस्त्याला खासदार कुलकर्णी यांनी विरोध दर्शविला असून, अहवालावर चर्चा करून रस्त्याबाबतचा निर्णय घ्यावा. भाजपला मतदान केलेल्या नागरिकांना गृहीत धरू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, मोहोळ यांनी विकास आणि पर्यावरण या दोन्हींचा समन्वय साधून योग्य तो निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

हेही वाचा – पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून

कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पौड रस्त्यावरून थेट सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने भूसंपादनासह अन्य प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यास पर्यावरण प्रेमी आणि अन्य स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास आणि पर्यावरण या दोन्हींचा समन्वय साधून योग्य तो निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, अशी भूमिका मोहोळ यांनी घेतली होती. लोकसभा मतदारसंघासाठी मोहोळ यांनी जाहीर केलेल्या ‘संकल्पपत्रात’ही हरित क्षेत्र जपण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रस्त्याच्या विरोधाचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. खासदार कुलकर्णी यांनी या रस्त्याला विरोध दर्शविला आहे. भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांना गृहीत धरण्यात येऊ नये, या प्रकल्पाबाबत चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी समाजमाध्यमातून मांडली आहे. त्यामुळे बालभारती पौड फाटा रस्त्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोथरूडचे आमदार, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य भाजप नेते या रस्त्यासाठी आग्रही आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या रस्त्याला होत असलेल्या विरोधावरून जानेवारी महिन्यात झालेल्या एका जाहीर सभेत नागरिकांना विरोध न करण्याची सूचना केली होती. हा रस्ता प्रस्तावित करण्यात आल्यानंतर प्रा. कुलकर्णी यांनी तेव्हाही नागरिकांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही ही योजना पुढे करण्यात आली होती.

रस्त्यासाठी २५३ कोटींचा खर्च

विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बालभारती ते पौड फाटा रस्ता; तसेच कोथरूड, पाषाण आणि सेनापती बापट रोड यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे जैवविविधतेला धोका, म्हणून नागरिकांचा यास विरोध आहे. या रस्त्यासाठी २५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो दोन किलोमीटर लांबीचा आणि तीस मीटर रुंदीचा आहे. त्यासाठी काही झाडे तोडावी लागणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; लोखंडी होर्डिंग कोसळले

अन्य पक्षांच्या भूमिकेतही बदल

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर रस्त्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांच्या भूमिकेतही बदल झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्त्याला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाही विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये दोन मतप्रवाह आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने मात्र सावध भूमिका घेतली आहे.

रस्ता व्हावा की नाही, याबाबत चर्चा होऊ शकते. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर नागरिकांशी चर्चा होऊ शकते. – प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी, खासदार