लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पदपथांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाच सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेनंतर नागरिकांना फुटपाथचा वापर करणे अधिक सोईस्कर होणार आहे. शहरातील रहदारी विचारात घेऊन रस्ते विकसित करणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. पादचारी मार्ग, सायकल मार्ग, सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते, अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील असा प्रयत्न आहे.
हेही वाचा… सरकारी काम अन् वर्षभर थांब! लायसन्स, ‘आरसी’साठी नागरिकांच्या नशिबी हेलपाटेच!
महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी; तसेच लहान मुलांसाठी शहरात ठिकठिकाणी सायकल पथ उभारण्यात आले आहेत. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ते काढले जाणार असल्याचे सिंह म्हणाले.