पुणे : सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात भरधाव मोटारीने वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी मोटारचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी मोटारचालक संतोष शिवाजी गायकवाड (रा. धायरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोटारचालक गायकवाड हे शिक्षक आहेत. बुधवारी दुपारी ते मोटारीतून नांदेड सिटी परिसरातील डीसी माॅलजवळून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटारीने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. त्यानंतर मोटारीने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी मोटारचालक गायकवाड यांना चोप दिला.

Hit and run in Koregaon Park area bike rider dies in collision with speeding car
कोरेगाव पार्क भागात ‘हिट अँड रन’, भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Women molested by scrap sellers in Sagaon Dombivli
डोंबिवलीत सागावमध्ये भंगार विक्रेत्यांकडून महिलांची छेडछाड
child died in a collision with a municipal garbage truck in Govandi Mumbai news
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
Lighting on trees, Navratri Utsav Mandals ,
डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई
dombivli Pendharkar College area traffic congestion due to vehicles parked on both sides of road
डोंबिवलीत घरडा सर्कल ते पेंढरकर महाविद्यालय रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहनतळ, धावणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्गिका उपलब्ध
Traffic congestion in Radhanagar Khadakpada Kalyan West disturbs residents and students daily
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

हेही वाचा >>>पुणे: लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारचालक गायकवाड यांना ताब्यात घेतले. अपघातात जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटारचालक गायकवाडची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.