पुणे : पुण्यातील कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणार्‍या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची घटना घडली. या घटनेत सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष?

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत धमकीची पोस्ट करणारा तरुण पुण्यातून ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. तेवढ्यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असलेल्या सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या वाहनांमधील काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. त्या सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या सर्वांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.