पुणे : भरधाव वाहनाने दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. अपघातात दुचाकीस्वार पती गंभीर जखमी झाला.
छाया सुहास जाधव (वय ३४) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात छाया यांचे पती सुहास शरद जाधव (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. याबाबत छाया यांचे बहीण रेणुका साळुंखे (वय ३२, रा. सोरतापवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून आता डिजिटल प्रमाणपत्रे, गुणपत्रके
दुचाकीस्वार सुहास आणि त्यांची पत्नी छाया पुणे-सोलापूर महामार्गावरून निघाले होते. सोरतापवाडी परिसरातील पुलाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार शरद आणि त्यांची पत्नी छाया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच छाया यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेला वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.