पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमधील शौचालयाच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. ही मागणी मार्गी लावावी यासाठी पतित पावन कामगार महासंघाकडून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक रित्या शौचालयास बसून नागरिकांनी निषेध नोंदविला.
पुणे शहरातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी येथे शौचालयाच्या दुरावस्थेबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडे मागील आठ महिन्यात वेळोवेळी पाठपुरवठा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: पुणे विद्यापीठावर भाजपचेच वर्चस्व; महाविकास आघाडीला एकच जागा

मात्र याची अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. त्या पार्श्वभूमीवर पतित पावन कामगार महासंघ अध्यक्ष रवींद्र भांडवलकर आणि पर्वती विभागप्रमुख संतोष गुरु यांच्या नेतृत्वाखाली बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रतीकात्मक शौचालयास बसून नागरिकांनी निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करीत आपल्या भागातील समस्या तातडीने सोडवल्या जातील, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. मात्र या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा सुरु आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A symbolic movement of citizens sitting on the toilet outside the regional office gultekdi colony pune tmb 01 svk