पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकलचा टँकर पलटी होऊन त्या अपघातात पाचजणांचा जळून मृत्यू झाला होता. निगडी परिसरात घडलेल्या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (निगडी) भक्ती-शक्ती उड्डाणपूल उतरताच एलपीजी गॅसच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. टँकर पलटी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

हेही वाचा – कुमार गंधर्व जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’चा विशेषांक; पुण्यात खास कार्यक्रम, प्रवेशिका आजपासून

टँकरमध्ये एलपीजी गॅस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गॅस ट्रान्सफर करण्याचं ठरवलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकलचा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत पाचजणांचा जळून मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अशी दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tanker carrying lpg gas overturned on the old pune mumbai highway passing through pimpri chinchwad city kjp 91 ssb