पुणे : Pune Solapur Highway Accident पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव इंधनवाहक टँकरने  दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला असून सहप्रवासी शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

योगिता राजकुमार गव्हाणे (वय ३५, रा. होले काॅम्प्लेक्स, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. अपघातात सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय १६) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

हेही वाचा >>> पुणे : लोनॲपद्वारे कर्ज तरुणीला पडले महाग; तीन हजार रुपयांसाठी गेले एक लाख!

योगिता गव्हाणे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कामाला निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडीजवळ भरधाव इंधनवाहक टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात योगिता आणि त्यांची मुलगी सुरेखा गंभीर जखमी झाल्या. दोघींनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच योगिता यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.