पुणे: शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथील एका शाळेत २७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा अकरा वर्षीय मुलगा सहावीत आहे. २७ सप्टेंबर रोजी संगणक अभ्यासक्रम वर्ग सुरू होता. त्या वेळी शिक्षक संदेश भोसले यांनी शर्ट नीट का खोचला नाही, अशी विचारणा करून मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे नाक आणि कानातून रक्तस्त्राव झाला. शाळेतून घरी आल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या मुलाला आईने पाहिले. मुलाकडे तिने विचारणा केली. तेव्हा शर्ट नीट न खोचल्याने शिक्षक भोसले यांनी मारहाण केल्याची माहिती त्याने आईला दिली. त्यानंतर पालकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, संबंधित शिक्षकाला नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दिली.