शिवजयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील मल्हारगडहून मावळ तालुक्यातील शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन जाणा-या टेम्पोला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ताथवडे येथे शुक्रवारी पहाटे साडे चारच्या सुमारास घडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विलास पोपट कोंडभर (वय २३), आदित्य संतोष सातकर (वय १३), विरेन राजू मोरे (वय १४), हर्ष निवृत्ती ढम (वय १२), दक्ष चंद्रकांत भानुसघरे (वय १४), हृतिक किसन सांडभोर, सोन्या संतोष कोंडभर, अभिषेक आत्माराम मोरे, वेदांत कैलास कोंडभर, साहिल बाळू पोटपोडे, संस्कार संजय कोंडभर, सिद्धेश रोहिदास कोंडभर, रोहन संतोष कोंडभर, करण शत्रुघ्न कोंडभर, गौरव शिवाजी भानुसघरे, सौरभ शत्रुघ्न कोंडभर, यश रामदास कोंडभर, अथर्व संतोष कोंडभर, सिद्धांत भानुसघरे, श्लोक विनायक कोंडभर (वय १०), आर्यन सोमनाथ कोंडभर (वय १४), कार्तिक गणेश भानुसघरे (वय १४), भावेस दत्ता कोंडभर (वय १३), संजय येवले (वय ३२) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. रामदास गंगाराम कोंडभर, दत्ता किसन कोंडभर, सुजल अंकुश भानुसघरे, साहिल दत्ता कोंडभर, विराज प्रकाश कोंडभर, विराज शिवाजी कोंडभर, सुजल संतोष कोंडभर, चेतन संतोष कोंडभर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सागर भागू कोंडभर (वय ३४, रा. शिलाटणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक नामदेव विनायक पाटोळे (वय ३६), क्लिनर प्रशांत विकास बनसोडे (वय २६, दोघे रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह ट्रक मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर सोमटनेतील पवना, पायोनीयर व रावेत येथील ओजस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टेम्पो चालक सागर आणि त्यांच्या गावातील शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगडावर गेले होते. तिथून शिवज्योत घेऊन येत असताना पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या टेम्पोला पाठीमागून नामदेव पाटोळे याच्या ताब्यातील ट्रकने धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या टेम्पोसोबत असलेले ३० जण जखमी झाले. ट्रकच्या धडकेमुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो समोरच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या अपघातात एकूण २४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, ट्रकचालकाला अटक करावी, या मागणीसाठी महामार्ग रोखून धरल्याने आठ वाजेपर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी भेट दिली.