लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : हडपसर भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. परशुराम शिवाजी माेरे (वय २४, रा. कोळविहिरे, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. कलहिपरग्गा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मोरेने शहरातील विश्रामबाग, लोणीकंद तसेच बारामती, विजापूर, सोलापूर, कर्नाटकातील इंडी परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. मोरे मजुरी करतो. त्याला दुचाकीवरुन फिरण्याचे आकर्षण होते. हौसेपोटी त्यांनी शहरातून दुचाकी चोरल्या. दुचाकी चोरल्यानंतर तो मूळगावी दुचाकी घेऊन जात होता. हडपसर पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मोरेला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दहा लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा – पुणे : रिझर्व्ह बँकेचा बँकांसह वित्तीय कंपन्यांना दणका

हेही वाचा – कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमांना लावली हजेरी

अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, संदीप राठो, समीर पांडुळे, सचिन जादव, शाहीद शेख आदींनी ही कारवाई केली.