लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: फर्ग्युसन रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसवर गुरूवारी सायंकाळी जीर्ण झालेले झाड पडल्याची घटना घडली. बसच्या काचा आणि समोरील बाजूवर या झाडाच्या फक्त फांद्या आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत चालकाला किरकोळ मार लागला असून, प्रवाशांना काहीही झाले नाही.

agartala lokmanya terminal express derailed
आसाममध्ये रेल्वेचा अपघात! आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले; जीवितहानी नाही
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Permanent or temporary toll free exemption for light vehicles at five toll booths in Mumbai
मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी कायमची की तात्पुरती?
strictly prohibited to carry on air travel
विमान प्रवासात कोणत्या गोष्टी घेऊन जाण्यास कठोर बंदी असते?
Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा
palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
palm beach traffic jam youth death
पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब
nagpur metro service disrupted
नागपूर मेट्रोत तांत्रिक बिघाड, सेवा खंडित; प्रवाशांची गैरसोय

पीएमपीची अप्पर ते निगडी ही बस फर्ग्युसन रस्त्यावरून सायंकाळी सहाच्या सुमारास जात होती. फर्ग्युसन महाविद्यालय समोरील थांब्यावर बस उभी राहिली. बसमध्ये काही प्रवासी चढले आणि बस हळूहळू सुरू झाली; पण तेवढ्यात मोठा आवाज झाला. पदपथावर असलेले जीर्ण गुलमोहराचे झाड मोडून बसवर कोसळले. झाडाचा बुंधा पदपथावर पडला, तर पुढील फांद्या बसच्या काचा आणि समोरच्या बाजूवर आदळल्या.

हेही वाचा… पिंपरी चिंचवड : पवना धरण ओव्हरफ्लो; ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

‘अचानक झालेला आवाज आणि तेवढ्यात झाड बसवर आदळल्यामुळे चालक आप्पाराव जाधव यांनी तत्काळ बस थांबवली. पण, या दरम्यान ते बाजूला पडले. यात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागला. या वेळी बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. झाड बसवर आदळल्यानंतर आतमधील प्रवासी घाबरून मागील बाजूला पळाले.

हेही वाचा… तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

पूर्ण झाड बसच्या मध्यावर पडले असते, तर मोठाच अपघात झाला असता. या घटनेनंतर नागरिकांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती पीएमपीच्या अपघात विभागाला देण्यात आली आहे,’ अशी माहिती वाहक महादेव डोंगरे यांनी दिली. या घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बससमोर पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक संथ झाली होती. बस खूप हळूहळू चालली होती.

अचानक मोठा आवाज झाला आणि झाड बसवर पडले. त्यामुळे बसच्या काचा फुटून माझ्या अंगावर आल्या. यात मी जागेवरून बाजूला पडलो. प्रवासीही घाबरून मागे पळाले. माझ्या पायाला थोडेसे लागले आहे. – आप्पाराव जाधव, चालक, पीएमपी