राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बाह्यवळण मार्गावरुन सिमेंट वाहतूक करणारा ट्रक शनिवारी निघाला होता. नवले पुलाजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघातात एक दुचाकी, मोटारीचे नुकसान झाले. दुचाकीस्वार, मोटारचालकास दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहायाने ट्रक पूर्ववत केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. नवले पुलावर अपघाताच्या घटना वाढीस लागल्याने महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या.

हेही वाचा >>> सासवड रस्त्यावर गादी कारखान्यात आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

बाह्यवळण मार्गावरदरीपूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडल्याने पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे. दरीपूल ते नवले पूल दरम्यान वेगमर्यादेबाबतचे फलक लावण्यात  आले आहेत. वाहनांचा वेग कमी ठेवण्यासाठी ठिकाठिकाणी वेग कमी करणाऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या (रम्बलिंग स्ट्रीप) लावण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A truck carrying cement overturned near navale bridge pune print news rbk 25 ysh
Show comments